नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भीषण असण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ॲाफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने एका अभ्यासातून काढला आहे. कोरोनाची दुसरी लाट निवळत असून तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच तसेच डेल्टा प्लस विषाणूचे ४८ रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष हाती आले आहेत.
लसीकरणामुळे कोरोना संक्रमणाची तीव्रती ६० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळेच देशात तिसऱ्या लाटेचा धोका कमी असू शकतो, असं अभ्यासात म्हटलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेंमध्ये विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउनची अंमलबजावणी करणे अत्यंत प्रभावी असल्याचं आयसीएमआरने म्हटले आहे. तसेच वेगवान लसीकरणामुळे भविष्यातील लाटा रोखण्यात यश येऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.
आयसीएमरने आपल्या स्टडीमध्ये कोरोना संक्रमणाच्या भविष्यातील लाटा टाळण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या त्रिसुत्रीचा वापर केल्यास संक्रमणाचा धोका कमी होईल, असा दावा आयसीएमआरने केला आहे.
आयसीएमआरच्या साथ व संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने राबविल्यास, तसेच लॉकडाऊनसारख्या उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ….तर पुजाराला संघाबाहेर करावे, गावसकरांनी मांडले मत
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- डब्ल्युटीसी गमावल्यानंतरही अमरनाथ यांच्याकडून विराटचे कौतुक
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘फायनल हा एकच सामना असतो’ ; बेस्ट ऑफ थ्रीवरून कोहलीला सुनावले


