🕒 1 min read
मुंबई : दिनांक ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान आता राज्य परिवहन महामंडळानंतर दिवाळीच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी ट्रॅव्हल बस वाहतुकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी खासगी बस वाहतुकदारांना केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.
या नियमांचे पालन करणे आवश्यक, वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.
मास्कचे वापर करणे सॅनिटायझर चा वापर करणे बस यामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी एखाद्या प्रवाशास ताप , सर्दी, खोकला, अशा प्रकारचे कोविड 19 चे प्राथमिक लक्षण दिसत असल्यास अशा प्रवाशांना बस मधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- आदिवासी भागातील बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी लढतेय ही तरुण अधिकारी!
- कोरोना संकटकाळात १ लाख १५ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक
- यंदाच्या दिवाळीत रितेश-जेनेलिया घेऊन येत आहेत जनसामान्यांसाठी ‘आशेची रोषणाई’…
- तरुणाईमध्ये उत्सूकता निर्माण करणारी Royal Enfield ‘Meteor 350’ अखेर भारतात देखील लाँच !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

