Share

आ.सतिश चव्हाणांच्या निधीतून घाटीस मिळाले ३० बायपॅप मशिन, एनआयव्ही मास्क, पेशंट सर्कीट!

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) कोविडग्रस्त रूग्णांकरिता वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मे महिन्यात २८ लाखांचा आमदार निधी दिला होता. या आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रसामग्री आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि.२०) अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

कोरोनाला नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने १६ एप्रिल २०२१ रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-१९ च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे.

घाटीस देण्यात आलेल्या २८ लाखाच्या निधीमधून ३० बायपॅप मशिन, १५० एनआयव्ही मास्क, १५० पेशंट सर्कीट आदी यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी देखील चव्हाण यांनी आमदार निधीतून घाटी रूग्णालयातील नवजात शिशु विभागात कोरोनाग्रस्त नवजात शिशुकरिता बेबी ट्रॉली, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर, रेडीयंट वार्मर, पल्स ऑक्सीमीटर आदी वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले होते. औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असून ही आनंदाची बाब आहे. माझ्या आमदार निधीतून घाटी रूग्णालयास देण्यात आलेल्या यंत्रसामुग्री व साहित्याचा कोविड बाधित रूग्णांवर उपचार करण्यास नक्कीच मदत होईल असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!