Share

Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र थंडीची लाट, तर पुण्यात कमाल तापमानाची नोंद

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातून परतीच्या पावसाने निरोप घेतात सर्वत्र थंडीची (Winter) हुडहुडी वाढत चालले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात Temperature चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारवा Cold Weather वाढला असून दुपारी उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे. तर, राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यामध्ये सरासरी तापमानाच्या तुलनेमध्ये 3.2 अंशाने घट झाल्याची दिसून आली आहे. हवामान खात्याकडून मिळाल्या माहितीनुसार, राजस्थान मधून येणारे थंड वारे आणि हिमालय पर्वतरांगेमध्ये सुरू असलेली बर्फदृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन महाराष्ट्रातील तापमान कमी होत चालले आहे.

राज्यात सर्वत्र थंडीची (Winter) लाट

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशातून निरोप घेतात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातही परतीचा पाऊस थांबला असून सगळीकडे आकाश निरभ्र झाले आहे. दरम्यान, तापमानात घट झाली असून थंडीची चाहूल लागली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगलाच वाढलेला दिसत, असून पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये थंडीमुळे हुडहुडी वाढली आहे. तर कोकणामध्ये देखील सर्वत्र धूक्याची चादर पसरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. राज्यामध्ये सकाळी थंडी तर दुपारच्या वेळी स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढू लागला आहे. तर कोकणातील बहुतांश गावांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे.

सध्या उत्तरेकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहे. त्यामुळे थंडी वाढत चालली आहे. ज्यावेळी हवा कोरडी असते त्यावेळी तापमानात चढ-उतार होत असतो. त्याचबरोबर वारे कोणत्या दिशेने वाहत आहे यावर देखील थंडीची तीव्रता अवलंबून असते.

महाराष्ट्रासह उत्तर भारतात वाढला थंडीचा जोर

देशात महाराष्ट्रासह उत्तर भारतातील थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये गेल्या काही दिवसापासून हवामान कोरडे असून थंडीचा कडाका वाढला आहे. या ठिकाणी तापमानात घट झाली असून दिवसा उन्हाचा चटका बसत आहे. मात्र, रात्री परत थंडीचा जोड वाढत आहे. दरम्यान या राज्यांमध्ये रात्री तापमानातही तीन ते चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!