🕒 1 min read
Shivsena | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षात पडलेल्या फूटवर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश आहे. त्यामुळे निकाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने लागणार की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी केली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीला आव्हान दिले आहे.
दरम्यान, प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला विरोध केला आहे. या विविध मुद्दय़ांवरील पाच-सहा याचिकांवर घटनापीठापुढे मंगळवारी म्हणजेच आज सुनावणी होणार आहे.
अपात्रतेच्या याचिका जर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी पाठविल्या गेल्या, तर त्यावर निर्णय होण्याआधी अन्य याचिकांवर सुनावणी होण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे या याचिकांवर अध्यक्षांकडे सुनावणी व्हावी, असा युक्तिवाद शिंदे गटातर्फे करण्यात येणार आहे. या मुद्दय़ांवर घटनापीठ कोणता निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bacchu Kadu | अमरावतीत बच्चू कडूंचा प्रहार मेळावा, मेळाव्यात ‘मै झुकेंगा नही’चे पोस्टर
- Uddhav Thackeray | “मोरबीचा पूल पडला, हि दुर्घटना एॅक्ट ऑफ फ्राॅड म्हणावी कि…?”, उद्धव ठाकरेंचा थेट मोदींनाच सवाल
- Eknath Khadse । बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
- Congress | शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा ; राज्यपालांकडे काँग्रेसची मागणी
- Ramdas Athawale । रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर रामदास आठवलेंची भन्नाट कविता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
