Share

उन्नाव, हैदराबाद घटनेनंतर CM ठाकरे घेणार महत्त्वाचा निर्णय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशातील महिलांच्या अत्याचाराच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांना आळा घाण्यासाठी महाराष्ट्रात बलात्काराच्या आरोपींना १०० दिवसांत फाशी दिली जावी, असा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाची दखल घातली असून मुख्य सचिवांकडून याबाबतच संपूर्ण अहवाल मागविण्यात आला असल्यची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

आंध्रप्रदेश विधानसभेत दिशा विधेयक २०१९ पारित करण्यात आले आहे. ज्यात आंध्रप्रदेश सरकारने बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा आणि २१ दिवसांच्या आत अशा प्रकरणांचा निकाल देण्याची तरतूद केली आहे. या कायद्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू करता येऊ शकतो, यासंबंधी अहवाल आणि मसुदा मागवला असल्याचे सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

सरनाईक म्हणाले की, “देशात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढत चाललं आहे. प्रत्येक राज्यात हा कठोर कायदा लागू झाला पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना हा कडक कायदा अंमलात आणावा, अशी मागणी केली आहे”. तसेच सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातच हे विधेयक संमत केलं जाऊ शकतं. मुख्यमंत्र्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली तर महाराष्ट्र हे अशा प्रकारचा कायदा बनविणारे दुसरं राज्य ठरेल, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1206543284568350721?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206548679634477067?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!