पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे भावनिक आव्हानापेक्षा, संवादापेक्षा श्रमतेंन आणि गतीनं काम करण्याची आवश्यकता ठाकरे सरकारला आहे. अशी टिका विधान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. इतर राज्यात कोरोना संपुष्टात आला असून आपल्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्यास निश्चित कोंरोना रोखण्यात ठाकरे सरकार कमी पडल आहे. अशी खंत सुद्धा दरेकर यांनी व्यक्त केली.
पुणे येथील सुखसागर नगर, गोकुळ नगर, साई नगर येथील नागरिकांच्या सोयीसाठी प्रभाग क्र.४१ यांच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते झाला असून माध्यमाशी बोलताना दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री वेगवेगळी वक्तव्य करत आहे, त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही असे दिसून येत आहे. लॉकडाउन करू, दंड वाढवू भीतीच वातावरण सरकारने करण्यापेक्षा लोकाना आधार आणि धीर द्यावा. तसेच लोकाना गर्दी करू नका सांगत असताना, लोकाना नियम शिकवत असताना सरकारमधील नेते लग्नसोहळा, कार्यक्रमाला जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरकारमधील नेत्यानाच नियम पाळण्याची व काळजी घेण्याची आवश्यकता असल्याच दिसून येत आहे.
दरेकर यांनी नाशिक मध्ये जात पंचायतीने उकळत्या तेलात महिलेचा हात बुडवून सत्वपरिक्षा देण्यास भाग पाडण्याचा प्रकार निषेधार्ह असल्याचे सुद्धा सांगितले आहे. तसंच हा प्रकार महाराष्ट्रासारख्या पूरोगामीत्वाचे ढोल पिटणाऱ्या राज्याला शोभा देणारा नाही अशी खंत दरेकर यांनी व्यक्त केली.
प्रविण दरेकर म्हणाले की, गेल्या महिन्यात पुण्यामध्ये अशा प्रकारचे जातपंचायतीचे महिलेच्या बाबतीत प्रकार झाला होता त्यावेळेस भाजपाने आवाज उठवत कडक कारवाई करण्यास भाग पाडले होते. तसंच माणुसकीला काळिमा लावणारा हा प्रकार असल्याच दरेकर यांनी सांगितल आहे. त्यामुळे या प्रकरणी देखील तात्काळ सर्व जातपंचायतीच्या लोकांची, प्रमुखांची, संबाधितांची चौकशी करत कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली. तसंच वारंवार अशा प्रकारचे प्रकार घडत आहे विशेतः ग्रामीण भागात ते थांबवण्याच काम राज्य सरकारने तात्काळ करावे. किंबहुना असे प्रकार राज्यभर वाढत राहतील नाहीतर अशा प्रकारची कृत्य घडत राहतील असा इशाराही दरेकर यांनी राज्यसरकारला दिला.
भाजपाची अनेक कार्यालय उघडताना दिसत आहे, अनेक प्रकारची विकास काम भाजप राज्यभर करत असताना अनेक अडथळे राज्य सरकारने आणले .त्यामुळे या सरकारला विकासकामाना स्थगिती देण्याशिवाय आणखी काय करता येत? असा सवाल दरेकर यांनी राज्यसरकारला केला. कोरोना काळात सरकार कोरंटईन झाल होंत त्यामुळे राज्याचे विरोधी नेते आम्ही कोंरोना काळात सुद्धा लोकांसाठी फिरत होतो. हॉस्पिटलमध्ये, कोरंटईन सेटर मध्ये जात होतो. कारण नेतृत्व लोकांसाठी असत घरात बसून आपण नेतृत्व करू शकत नाही असा टोला सुद्धा दरेकर यांनी राज्यसरकारला दिला.
आज पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे, कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुण्यात नाही आहे, त्यामुळे आपण राज्यकर्ते काशसाठी आहात असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होंत आहे. महिला सुरक्षतेचा प्रश्न असो, विजमाफीचा प्रश्न असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारच लक्ष आपली खुर्ची कशी टिकेल यांकडेच असते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच चिंतन व काळजी करण्यासाठी या भाजप जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटन होंत असल्याच दरेकर यांनी सांगितल आहे.
यावेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेविका रंजनाताई टिळेकर, नगरसेविका वृषाली कामठे, नगरसेविका मनिषा कदम, नगरसेविका राणी भोसले, नगरसेवक विरसेन जगताप आणि नगरसेवक तुषार कदम उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत, ना दिलासा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
