Share

डिजिटायझेशनमुळे पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान होईल – मुख्यमंत्री

Published On: 

औरंगाबाद : डिजिटायझेशनमुळे राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होत आहे. डिजिटल संकल्पनेमुळे पोलिसांच्या कामात अधिक सुसूत्रता, शिस्तबद्धता व पारदर्शकता आली असून महाराष्ट्र हे डिजिटल पोलिसिंग राज्य झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या सुसज्ज तीन मजली इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, सुभाष झांबड, सय्यद इम्तीयाज जलील, अतुल सावे, प्रशांत बंब, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त डॉ.निपुण विनायक, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस यंत्रणेत गतिमानता येण्यासाठी संपूर्ण राज्यात पोलीस आयुक्तालये, पोलीस अधीक्षक कार्यालये, पोलीस ठाणे डिजिटायझेशन यंत्रणेच्या माध्यमातून जोडली गेली आहे. यामुळे नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी नोंदविणे शक्य झाले आहे. ऑनलाईन कामकाज सुरू झाल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. दीड वर्षाच्या कालावधीत आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे.

या इमारतीतील सोयीसुविधा पोलिसांना लोकाभिमुख करण्यासाठी उपयुक्त आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होईल. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नागपूर शहरात कमांडिंग नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून नाशिक आणि औरंगाबाद शहरात असा कक्ष लवकरच तयार करण्यात येईल, यामुळे नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यास पोलीस प्रशासनास मदत होणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी शासनाने पोलीस वेल्फेअरच्या माध्यमातून विविध योजना, आरोग्य सुविधा आखल्या आहेत. पोलिसांना उत्तम दर्जाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करुन दिला असून या माध्यमातून पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाची नूतन इमारत ही ग्रीन बिल्डिंग असून नैसर्गिक हवा, पुरेशी प्रकाश व्यवस्था, सौरऊर्जा निर्मिती, अशी नियोजनबध्द व्यवस्था इमारतीत करण्यात आली आली असून यामुळे पोलिसांच्या कामाचा दर्जा सुधारण्यास नक्कीच मदत होईल. पोलिसांना चांगले काम करता यावे यासाठी आधुनिक सर्व दर्जेदार सोयीसुविधा इमारतीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!