Share

मग देव गायकवाडला तुमचा समजायचं का?; मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांवर निशाना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमधील गुंड मुन्ना यादव प्रकरणावरून विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधताना दिसत आहेत. यानंतर आता सोशल मिडीयाचा गैरवापर अयोग्य असून देव गायकवाड या व्यक्तीने मध्यंतरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध काही पोस्ट टाकल्या होत्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष तपासात ती व्यक्ती महादेव बालगुडे असल्याचे सिद्ध झाले. बालगुडे हा बारामतीचा असून तो राष्ट्रवादीच्या शिबिरात होता त्यामुळे त्याला आम्ही पवारांचा माणूस समजत नाही. तसेच मुन्ना यादव माझा मतदारसंघ सांभाळतो अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

मध्यंतरी राज्यामध्ये देव गायकवाड फेक फेसबुक अकाऊंट प्रकरण गाजले होते. सोशल मिडीयावर या अकाऊंटच्या अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या ओएसडी निधी कामदार यांच्या नावाने खोटं अकाऊंट काढुन देव गायकवाड ला पैसे ऑफर केले अशा आशयाचे स्क्रिनशॉट देव गायकवाड च्या फेसबुकवरुन प्रसारीत करण्यात आले होते. यानंतर कामदार यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर हे अकाऊंट काही काळ बंद करण्यात आले .

पोलीस तपासात हे अकाऊंट फेक ठरले असुन महादेव बालगुडे नामक व्यक्ती ते हताळत असल्याचे समोर आले होते. दरम्यान बालगुडे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता मुन्ना यादव प्रकरण थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्याकडून याच प्रकरणाचा हवाला दिला जात असल्याच दिसत आहे.

नेमक काय म्हणाले मुख्यमंत्री
देव गायकवाड या व्यक्तीने मध्यंतरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध काही पोस्ट टाकल्या होत्या. प्रत्यक्ष तपासात ती व्यक्ती महादेव बालगुडे असल्याचे सिद्ध झाले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यात एक पत्रकारदेखील होता. सोशल मीडियाचा गैरवापर दंगली घडविण्याच्या, सामाजिक अशांततेसाठी केला जात असेल तर कारवाई ही केलीच जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. यावेळी अजित पवारांना टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले की, बालगुडे हा बारामतीचा असून तो राष्ट्रवादीच्या शिबिरात होता त्यामुळे त्याला आम्ही पवारांचा माणूस समजत नाही. नसत्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना सांगलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक सचिन सावंत यांची आठवण करून देत चिमटा काढला. खून, खुनाचे प्रयत्न, गंभीर दुखापतीचे गुन्हे सचिन सावंतविरुद्ध दाखल आहेत. तो तुमच्या जवळचा आहे असे लोक म्हणतात. ‘आम्ही त्याला मकोका लावणार आहोतच, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. लोक म्हणतात म्हणून सावंत तुमच्या जवळचा ठरत नाही तसेच मुन्ना यादव माझा मतदारसंघ सांभाळतो अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!