टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारतोफांमुळे सैरभैर झालेली भाजपही आता राज यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमधील सभेत राज ठाकरेंबाबतचे व्हिडिओ सादर करून त्यांच्यावर पलटवार करतील, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिक मध्ये सभा आहे.


