🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार देशात महायुतीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातही सेना-भाजप युतीने मुसंडी मारली आहे. निकाल आपल्या बाजूने लागत असल्याचे पाहून आता भाजपनेत्यांचे मनोबल वाढले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला आहे.
राहुल गांधींवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, की राहुल गांधी रोज खोटे बोलत होते. कोर्टाची दिशाभूल करत होते. मात्र, ते जनतेला समजते त्यामुळे जनतेने या मतदानातून दाखवून दिले असल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. तसेच मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंची भाषणे ही विसंगत आणि खोटी होती, ते शेवटच्या क्षणी शेलारांनी जनतेला दाखवून दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दरम्यान,शिवसेना गेल्या ३० वर्षापासून आमच्यासोबत आहे. आमची युती मुद्द्यावर मतभेद होते ते दूर केले. मात्र, आम्ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही युती केली आहे आणि ती विधानसभा निवडणुकीतही राहणार, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
