Share

पुढच्या वर्षीही विठुरायाच्या महापूजेचा मान मला मिळेल ; मुख्यमंत्र्यांना विश्वास

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या महापूजेचा मान मिळेल, असे वक्तव्य केले आहे. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात महापूजा झाली, महापुजेनंतर ते बोलत होते.

भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी…एक एक पाऊल टाकत आता विठ्ठलाचं रुप पाहण्यासाठी आता डोळे आतूर झाले आहे. आज आषाढी असल्यामुळे पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलं आहे. अलोट गर्दी पंढरपुरात झाली आहे. चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. अशी इच्छा घेऊन आज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहे.

दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठूमाउलीची शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडली. तर लातूरमधील अहमदपूरचे रहिवासी विठ्ठल चव्हाण तसेच त्यांच्या पत्नी प्रयागाबाई चव्हाण यांना वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पूजेला बसण्याचा मान मिळाला.

रात्री सव्वादोन वाजता या महापूजेला सुरवात झाली तर पहाटे ३ वाजता विठूरायाची महापूजा संपन्न झाली. विठूमाऊलीच्या मूर्तीला पंचांमृताने स्नान घालून चंदनाचा लेप लावून महापूजा केली तसेच तुळशीच्या हारांनी मूर्तींना सजवण्यात आले.

महापुजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते, त्यावेळी पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल, अशी आशा व्यक्त केली. इतकेच नव्हे तर विठ्ठल तसेच विठ्ठलरुपी जनतेचे आशीर्वाद गेल्या वेळी मिळाले होते, असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील दुष्काळ दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलं.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य यावरून पुढचा मुख्यमंत्री कोणाचा होणार असा प्रश्न उपस्थित झाला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!