Share

अजित पवार गटाच्या विजयानंतर माळेगाव साखर कारखान्याच्या पहिल्याच बैठकीत वाद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा  : निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. या निवडनुकीनंतर आज नवनिर्वाचित संचालक व मावळते संचालक यांची बैठकीत वाद बघायला मिळाला.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर तील नवनिर्वाचित संचालक व मावळते संचालक मंडळामध्ये प्रोसेडिंग कायम करण्याच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. आज सायंकाळी ही  घटना घडली. सदर प्रोसिडिंगमध्ये नवीन कामगार भरती विषयासह विविध मंजूर कामांची प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे, या मुद्द्यावर आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी पुरस्कृत नवनिर्वाचित संचालकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

हा पेचप्रसंग सोडविण्यासाठी कार्यकारी संचालक विजय वाबळे यांनी साखर आयुक्त कार्यालयाची संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी साखर आयुक्त कार्यालयाला गेलेल्या पत्रकाची प्रत मिळावी, अशी मागणी तक्रारकर्ते नवनिर्वाचित संचालकांनी केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, केशवराव जगताप, अनील तावरे, योगेश जगताप आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

परंतु याला मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी ही प्रत देता येणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतल्याने आणखीनच तणाव वाढला आहे. यासंबंधी कायदा-सुव्यवस्था निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या कारखाना कार्यस्थळावर तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येते.

चार दिवसांपूर्वी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नीलकंठेश्वर पॅनेलने अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली येथील सत्ता खेचून घेतली. सध्या सत्ताधारी असलेले रंजन तावरे व चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचा राष्ट्रवादीने धुव्वा उडवला. या निकालाची पार्श्वभूमी या वादाला आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!