नागपूर : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे राज्यभरात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कारवायांमुळे त्यांना राजकीय मंडळी , व्यापारी, अवैध धंदे करणाऱ्या अनेक माफियांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले असले तरी कामाची पद्धत त्यांनी कायम ठेवली असल्याचे कोरोना काळात देखील पाहायला मिळाले होते.
नागपूर पालिका आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती केलेल्या तुकाराम मुंढे यांची ती पण बदली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंढेंच्या बदलीचा सस्पेंस क्रीएट झाला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात अनेक वेळा नागरिक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. आता त्यांची नागपूर महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आल्यानंतर आज ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. तुकाराम मुंढे मुंबईला रवाना होण्याआधी नागपूरमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.
दरम्यान, मुंढे हे आता विनापदाचे असून त्यांच्यासाठी नवीन पोस्ट शोधली जात असल्याची माहिती आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहेत. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली.
महत्वाच्या बातम्या:-
मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याची गुर्मी कंगनाला कुठून आली- प्रशांत गडाख
भविष्यात विखे कुटुंब पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसले, तर नवल वाटायला नको- हेमंत ओगले
निरोप घेताना काय म्हणाले तुकाराम मुंढे? बघा सविस्तर व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

