Share

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी; सुप्रिया सुळे यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय,शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेने प्रवास करावा लागतो. परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळे त्यांची अडचण होत आहे. हे लक्षात घेता दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी रेल्वे वाहतूक 14 महिन्यांच्या खंडानंतर सामान्य मुंबईकर प्रवाशांसाठी 15 तारखेपासून सुरू झाली. सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांतील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असून दररोज लोकल प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त काही प्रमाणात दोन लसमात्रा घेतलेल्या सामान्य प्रवाशांचीही प्रवासात भर पडली. दरम्यान, कल्याण, डोंबिवली आणि बोरिवली, भाईंदर यांसह काही मोजक्याच स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी अधिक होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!