Share

नाताळ विशेष : बाजारपेठा गजबजल्या तर गिरीजाघरांवरील रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवस म्हणून नाताळ साजरा केला जातो. नाताळचा सण अगदी आठ दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच नाताळा निम्मित पुणे शहरातील बाजारपेठा गजबजून गेलेल्या दिसत आहेत. वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे.

लाल रंगाचे सांताक्लॉजचे मुखवटे, ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. तर गिरीजाघारांची रंगरंगोटी आणि रोषणाईचे कामदेखील अंतिम टप्प्यात आलेले दिसत आहे. सुटीच्या दिवशी नागरिक ख्रिसमसची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फिरताना दिसत आहेत.

नाताळच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना, उपासना केल्या जातात. ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात.या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून ख्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले जाते. या याच दिवशी रात्री सांता क्लॉज ची वेशभूषा करून लहान मुलांसाठी भेटवस्तू दिल्या जातात.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1206937481540538368?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206935197662318592?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!