Share

हातात दगडाऐवजी बॅट-बॉल घ्या- मोहम्मद कैफ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- हातात दगड आणि बंदूक घेण्याऐवजी बॅट-बॉल घेतलं तर परिस्थिती कशी बदलू शकते आणि काश्मिर अजुन किती सुंदर दिसू शकतं याचं उदाहरण मंझुरने दाखवून दिलं असल्याचं सांगत भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने काश्मिरी युवकांना सन्मार्गावर चालण्याचं भावनिक आव्हान केलं आहे.आयपीएल च्या अकराव्या हंगामात जम्मू-काश्मिरमधून मंझुर दर या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने २० लाखांची बोली लावत खरेदी केलं आहे .या निवडीवरून मोहम्मद कैफने हे ट्वीट केलं आहे.

mazoor-dar

मंझुर हा आयपीएलमध्ये खेळणारा दुसरा काश्मिरी युवक ठरला आहे.आपल्या गावात ‘पांडव’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंझुर दरने विजय हजारे करंडकात जम्मू-काश्मिरचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या धिप्पाड देहयष्टीसाठी ओळखला जाणारा मंझुर हा स्थानिक लोकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. क्रिकेटव्यतिरीक्त आपल्या परिवाराचं पालनपोषण करण्यासाठी मंझुर दर सुरक्षारक्षकाचीही नोकरी करतो.

गावातील मंझुर दर या खेळाडूवर किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने २० लाखांची बोली लावत खरेदी केलं आहे. २४ वर्षीय दरच्या लिलावासंदर्भातसली माहिती कळल्यानंतर त्याच्या गावातील लोकांनी रस्त्यावर येत नाचत आपला आनंद व्यक्त केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!