मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मजूरांना गावी जाण्यासाठी मदत करणारा अभिनेता सोनू सूद याच्या कामाची प्रचंड चर्चा सुरु आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदच्या एकूण कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनातील ‘रोखठोक’ या सदरात संजय राऊत यांनी सोनू सूदला दत्तक घेऊन भाजप नेते उत्तर भारतीय व्होटबँकेचे राजकारण करु पाहत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या लेखात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. सूद याने म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवले. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीच केले नाही. यानंतर राज्यपालांनी त्याला थेट राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि बँक कर्मचारी जीवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचे कधी कौतुक झाले नाही. हा सगळा घटनाक्रम संशय निर्माण करणारा असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
काल दिवसभर राज्याचे राजकारण सोनू सूद वरून तापलं असताना रात्री उशिरा अभिनेता सोनू सूद याने मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत अस सोनू सूद यांने स्पष्ट केलं आहे.
सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने आम्हाला धोका दिला – राजनाथ सिंग
यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया देत संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी व्हाट्सअॅपला आलेला एक फॉरवर्ड मेजेस ट्विट करून संजय राऊत यांच्यावर शरसंधान साधलं आहे. ‘डिअर सोनू सूद,राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही’. अशा आशयाचे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
डिअर सोनू सूद,
राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस.लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही…..????????
साभार – Whatsapp— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 8, 2020
दरम्यान, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक चांगलं काम केलं. त्याचं कौतुक झालं पाहिजे. अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहते.
तर, आमचं सरकार राज्यात जलयुक्त शिवारचं काम करत असताना नाम फाऊंडेशन आणि आमीर खानची पाणी फाऊंडेशनही समांतर काम करत होती. पण आम्ही हेवेदावे ठेवले नाहीत. ते एकप्रकारे सरकारला मदत करत होते. त्यामुळं त्यांना मदत कशी करता येईल हेच आम्ही पाहिलं,’ असं फडणवीस म्हणाले. ‘जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असंही फडणवीस म्हणाले.
‘डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये करण्याचा निर्णय रद्द करून भारतातच निर्मिती करावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

