नवी दिल्ली : शिवसेनेने सत्तेच्या हव्यासापोटा भाजपाला धोका दिला असा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी केला आहे. भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. “जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. मी भाजपाचं चारित्र्य स्पष्ट करु इच्छितो. आम्ही धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे,” असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार तीन पक्षांचे सरकार आहे . मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याचा घणाघाती टोला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही. अस देखील राजनाथ सिंग म्हणाले आहेत.
जब चुनाव लड़ना हुआ तो भाजपा और शिवसेना का गठबंधन हुआ।
लेकिन गठबंधन के बाद सत्ता की हवस में भाजपा को धोखा दिया गया।
मैं भाजपा के चरित्र को स्पष्ट करना चाहता हूं कि-
हम धोखा खा सकते हैं, लेकिन धोखा कभी दे नहीं सकते हैं।
यह भाजपा का चरित्र है: श्री @rajnathsingh #BJPJanSamvad pic.twitter.com/TYVS57Wuj7
— BJP (@BJP4India) June 8, 2020
दरम्यान, “जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. मी भाजपाचं चारित्र्य स्पष्ट करु इच्छितो. आम्ही धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे,” असं देखील राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

