Share

पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटले, दोघांचा मृत्यू तर २५ पेक्षा जास्त जण बेपत्ता

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. सतत होणार्या पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. मंगळवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास ही घटना घडली असून यात २३ ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. मुंबईसह राज्यात पडणाऱ्या पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसामुळे मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली आहे. याचा फटका ७ गावांना बसला असून यामध्ये आतापर्यंत २५ जण बेपत्ता झाले आहेत. तर आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती आले आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच NDRF च्या पथकाला मदतीसाठी बोलवण्यात आले असून बचावकार्य सुरु आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!