Share

गोंदियाचा चिन्नोर तांदुळ जाणार जागतिक बाजारपेठेत,शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार

Published On: 

गोंदिया : धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात २० वर्षांपूर्वी चिनोर धान (तांदूळ) पिकाची लागवड केली जात होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे येथील शेतकऱ्यांनी चिनोर जातीच्या भाताची लागवड करणे बंद केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी पुन्हा चिनोरची लागवड करून आर्थीक उन्नती साधावी. यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी आंतरराष्ट्रीय धान संशोधन केंद्र (आय.आर.आर.आय.) च्या माध्यमातून शास्त्रज्ञांसमवेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. लवकरच गोंदिया, भंडारा जिल्ह्यात चिनोर धानाची लागवड होणार आहे.त्यामुळे आता गोंदियाचा तांदुळ आता जागतिक बाजारपेठेत जाणार आहे.

संपूर्ण राज्यात गोंदिया, भंडारा जिल्हा हा धान उत्पदक जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पण, नैसर्गीक तसेच इतर कारणाने जास्त नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी धानसह भाजीपाल्याची लागवड सुरू केली. पण, भंडारा व गोंदिया येथील जमीन ही चिनोरसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांनी चिनोर उत्पन्न सुरू करावे, असा खासदार मेंढे यांनी निर्धार केला असून वाराणसीहून शास्त्रज्ञांना बोलावून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. केंद्र सराकर इर्रीशी करार करत गोंदिया, भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर चिनोर धानाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान, भंडारा जिल्हा धान उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. येथील तांदूळ हा ‘फाइन तांदूळ’ म्हणून ओळखले जाते. यासारखा तांदूळ देशात कुठेही मिळत नाही. परंतु, येथील शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नसल्याने दरवर्षी त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. चिन्नोर तांदळाला विशिष्ट सुगंध आणि चव आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, शेतमालाचे ब्रँडींग करणे अत्यावश्यक आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!