Share

कर्नाटक-महाराष्ट्रातील चिंचली मायाक्का मंदिर खुले, कोरोना संक्रमण कमी झाल्याने निर्णय

Published On: 

रायबाग: कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मायाक्का चिंचली येथील मायाक्का देवीचे मंदिर तब्बल १९ महिन्यांनी बुधवारी तहसीलदार रियाज बागवान यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. यावेळी पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी पार पडल्या. मात्र आता राज्यातील इतर मंदिरे कधी उघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान कोरोना संक्रमण कमी झाल्याने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मंदिर खुले करण्याचे आदेश मंगळवारी दिले. त्यामुळे आज २२ सप्टेंबररोजी येथील मंदिर विविध पूजाविधीनंतर खुले करण्यात आले. या मंदिरात कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने मायाक्का देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनामुळे गेली दीड वर्षांपासून मंदिर बंद होते. मात्र आता मंदिराची दारे उघडी झाल्याने भाविकांमध्ये एक वेगळाच उत्साह आता दिसून येत आहे.

दरम्यान मंदिरे जरी खुली केली असली तरी, कोरोनाची सर्व नियमे पाळणे भाविकांना बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!