नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. गलवान खोऱ्यात15 जून रोजी ज्या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चकमक झाली होती. यानंतर मोठ्या प्रमाणावर या भागात दोन्ही बाजूच्या सैन्याची संख्या वाढविण्यात आली होती यामुळे मोठा तणाव या परिसरात पाहायला मिळत होता.
बंदीमुळे टिकटॉक निर्मात्या कंपनीला बसू शकतो ६ अब्ज डॉलरचा फटका
आज भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत.
Chinese heavy armoured vehicles still present in depth areas in Galwan river area. Indian army monitoring the situation with caution: Indian Army Sources https://t.co/GbGnoAy4K4
— ANI (@ANI) July 6, 2020
चीनने हे तंबू तणाव निवळण्यासाठी केलेल्या चर्चेनंतर हटवले आहेत. दोन्ही देशांनी डिसएंगेजमेंटवर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत सैन्य सध्याच्या ठिकाणावरुन मागे हटलं आहे. तणाव निवळण्यासाठी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्यात येणार आहे.
एटिकेटीच्या विद्यार्थ्यांनो आमच्यावर विश्वास ठेवा- उदय सामंत
दरम्यान, 3 जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लेहचा दौरा केला होता. मोदी यांच्या लेह-लडाख भेटीने सगळ्या जगाचं लक्षं वेधून घेतलं. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात होती. मोदींच्या या भेटीने चीनवर मोठा दबाव आला होता असं तज्ञांचे मत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

