Share

जागतिक कर्करोग दिनी चिमुकलीचे केस दान

Published On: 

औरंगाबाद : प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून केसांकडे पाहिले जाते. मात्र कर्करोगाने ग्रस्त महिलांचे केस उपचारादरम्यान जातात. अशावेळी आत्मविश्वासात कमतरता, नैराश्य यांसारख्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत कर्करोग पिडीत महिलांना विग बनवण्यासाठी सिल्लोडमधील मयुरी बोर्डे या चिमुकलीने आपले केस दान करत सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे. अभिनव प्रतिष्ठानच्या पुढाकारानंतर अनेक महिला पुढे येऊन कर्करोगग्रस्त महिलांच्या वेदना वाटून घेत आहेत.

४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे अभिनव ट्रेनिंग स्कुल मध्ये ‘डोनेट हेयर ,डोनेट कॉन्फिडन्स’ हा उपक्रम राबविण्यात आला. केमोथेरपी व रेडियोथेरपी या उपचार पद्धतीने कर्करोगावर आता काही अंशी मात करता येत असली तरी या उपायांमुळे मुळापासून केस जाण्याची समस्या निर्माण होऊन मुली, महिलांना टक्कल पडते. हे अजून एक अतिरिक्त दुखणे त्यांच्या वाट्यास येते. यामुळे त्यांना निराशाही येते, आत्मविश्वास खालावतो.

त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत यावा, कॅन्सरमधून बरे झाल्यावर जगण्यास उभारी यावी म्हणून अभिनवतर्फे अध्यक्ष किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी पवार यांनी कर्करोगग्रस्त महिलांसाठि विग बनवण्याऱ्या मुंबई येथील संस्थेस मदत म्हणून ‘हेयर डोनेशन’चा उपक्रम राबविला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!