Share

राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी गरीब रुग्णांना दिलासा देण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहत विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणाले आहेत की ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा’ अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.

मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे, अस धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1194962539257319425?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194962445149728768?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1194961555386814464?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!