🕒 1 min read
मुंबई/ऋषिकेश घोगरे:- राज्यात सातत्याने महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना राज्य सरकार काहीही पावले उचलत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. हाथरसवरुन राजकारण करणारे आता कुठं गेले?, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने विचारला आहे.
बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला ऍसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 15, 2020
बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा अत्यंत वेदनादायी प्रकार घडला आहे. अखेर १२ तासानंतर तिची मृत्यूशी झुंज संपली. त्यानंतर आता निलेश राणे यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अॅसिड टाकून ठार मारण्यात आले. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत.
पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी ही घटना घडली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १५ नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
- वर्षानुवर्षे ज्यांनी आरक्षण घेतलं आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवं : संजय राऊत
- सेक्युलर ही एक प्रकारची ‘शिवी’, या देशात कोणीही सेक्युलर नाही, संजय राऊतांचे मोठे विधान!
- ‘आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे’, रितेशची लय भारी! पोस्ट
- पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, भाविकांच्या दर्शनासाठी धार्मिकस्थळे खुली
- बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची रेणू देवी घेणार शपत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
