Share

मुख्यमंत्री ठाकरेंना घरा बाहेर पडू देणार नाही, गोळ्या घातल्या तरी चालतील; मराठा आंदोलक आक्रमक

Published On: 

पुणे: मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लाववेत अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली.

यावेळी त्यांनी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्या प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देखील देण्यात यावी, अशी मागणी केली. तर, पदाधिकाऱ्यांनी, “मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या वेळी ४२ बांधवांनी बलिदान दिले.

नेते राजीव सातव यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर साधला निशाणा; म्हणाले…

या प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख आणि कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीचं आश्वासन दिले होतं. मात्र, या आश्वासनाची अजूनही पूर्तता झाली नाही. २०१७ मध्ये आझाद मैदानात प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर होत आहे.” यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.

‘नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे ‘राफेल’ जेट पण आले नसतं’

तसेच, “३० जुलैला बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. मात्र आता कोणतीही बैठक, चर्चा न करता ४२ जणांना नोकरीवर घ्यावं, अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नाही. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 ऑगस्टला मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा आणि मातोश्रीसमोर उपोषणाला बसू. त्यांना घराबाहेरही पडू देणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल,” अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाने घेतली आहे.

मोरारी बापू देणार अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी

तर, आता बैठक/चर्चा नको थेट मागण्या मान्य करून त्याची पूर्तता करा असे देखील त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना बैठकीला बोलावलं असलं तरी आमच्यापैकी कोणीही जाणाऱ्या नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मागण्या मान्य न केल्यास 9 ऑगस्टला क्रांती दिनी थेट आंदोलन केलं जाईल. अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करु. ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी आहे. समाजातील काही लोकांना हाताशी धरुन समाजाच्या मतासाठी वापर होतो, अशी खंत देखील व्यक्त केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!