Share

मोरारी बापू देणार अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी

Published On: 

नवी दिल्ली- श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे.

अयोध्यामधील पुजाऱ्यांनी तीन दिवसीय वैदिक अनुष्ठानांसह तीन ऑगस्टला रामजन्मभूमी साइटवर सोहळ्यासाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दि. ४ ऑगस्टला रामाचार्य पूजा होईल. यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या भूमिपूजन आयोजित केले जाईल. मोदी यांची अयोध्या आणि राम मंदिर परिसराची ही पहिली भेट असेल. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापण्याची घोषणा केली होती.

भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मंदिर गाभाऱ्यासाठी पाच चांदीच्या विटा लावल्या जातील, त्यामध्ये पंतप्रधान मोदी प्रथम वीट लावतील. हिंदू पुराणकथांनुसार ५ विटा ५ ग्रहांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. विश्व हिंदू परिषदेने (VHP) प्रस्तावित केलेल्या आधारे मंदिराची रचना आणि वास्तुकला ठेवण्यात आले आहे. मंदिराची रचना विष्णू मंदिराच्या शहर शैलीची असेल. तर मंदिर गाभारा अष्टकोनी असेल.

दरम्यान, आता अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असून याकामासाठी दान देऊ लागले आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले. यावेळी व्यासपीठावरुन राम मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

महत्वाच्या बातम्या-

…तर शिवसेनेसोबत येण्यास भाजपा तयार: चंद्रकांत पाटील

चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या;आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!