मुंबई : शिवसेनेच्या नावाखाली माधुकरी मागू नका असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. स्वतःच्या बळावर निवडून या असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत हे रोज सकाळी उठून फक्त बोलत असतात. मला राज्याच्या पूर परिस्थितीवरही लक्ष द्यायचे आहे, असे प्रत्युत्तर उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
संजय राऊत म्हणाले होते, “ते बेईमान असूनही स्वतःच्या बेईमानीची करणे देत असतात. तुम्ही शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून स्वतःचा वेगळा संसार मांडा.”
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका केली. मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आम्ही घेत आहोत, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची देखील माहिती देण्यात आली.
ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र शिंदे सरकारने हे निर्णय स्थिगित केले होते. दरम्यान औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath shinde | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
- Srilanka Crisis : श्रीलंकेत पेट्रोलसाठी ‘हा’ स्टार क्रिकेटपटूही राहिला २ दिवस रांगेत उभा; म्हणाला…
- Shivsena and bjp : शाहाजी बापू पाटील यांचा कानमंत्र! सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हसून-हसून लोटपोट
- Gopichand Padalkar | “शरद पवार कधी घरात बसतात आणि मी…” ; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

