Share

संजय राऊत संतापले, ८० तासांसाठी मुख्यमंत्रिपद भूषवत महाराष्ट्राशी गद्दारी केली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ” विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासांसाठी मुख्यमंत्रिपद भूषवत महाराष्ट्राशी गद्दारी केली,” असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ट्विटर करत त्यांनी फडणवीस यांना महाराष्ट्राशी गद्दारी केली असल्याचा उल्लेक्ख केला आहे.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही राऊत यांनी फडणवीसांवर ताशेरे ओढले. राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या पै पै पैशावर राज्याच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा खुलासा हा देवेंद्र फडणवीस नाही तर सचिव करतील. ” आज झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.संजय राऊत यांचासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करुन फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. ” हा महाराष्ट्राशी द्रोह, असे असेल तर महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. तसेच भाजपने ही योजना खूप आधीपासून आखली होती. ते सर्व पूर्वनियोजित होतं, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हेगडे यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात चर्चना उधान आले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1201403820271472640?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1201404183041044481?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!