मुंबई – छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर खासदार सुळे यांनी काल जेव्हा आमच्या बहिणींवर आयकर विभागाने धाड टाकल्याबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
एरवी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करत आहेत. छत्रपती शिवरायांनी कधी महिलांवर अन्याय होऊ दिला नाही. मात्र मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते, याची आठवण @supriya_sule यांनी करून दिली.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 8, 2021
दरम्यान मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तीनही बहिणी खंबीर आहेत. त्या यातून बाहेर पडतील. जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही अशा शब्दात खासदार सुळे यांनी त्यांना खंबीर साथ दिली आहे.
केंद्रसरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच केला पाहिजे असं देखील सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- “मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय म्हणजे मागच्या दाराने बिल्डरला आंदण होय”
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

