मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. यावर अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली असून, उद्या मुंबई हायकोर्ट यावर निर्णय सुनावणार आहे. बुधवारी न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.
बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५(१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

