Share

माझं वय ७१ वर्षे झाले आहे;मला जामीन द्या:भुजबळ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ‘आता आपले वय ७१ वर्षे झाले आहे आणि २१ महिन्यांपासून कोठडीत असून तपास यंत्रणांना आणखी कोठडीची आवश्यकता नसल्याने जामीन द्यावा’, अशी विनंती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘पीएमएलए’ न्यायालयाला केली आहे .

नवीन महाराष्ट्र सदनाचे बांधकाम व अन्य कंत्राटांच्या बदल्यात काळा पैसा कमाई केल्याचा आरोप असलेले भुजबळ यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात प्रयत्न सुरू केले आहेत. ‘माझ्या अशिलाचे वय आता ७१ वर्षे आहे आणि ते गेल्या २१ महिन्यांपासून कोठडीत आहे. त्यांनी आतापर्यंत तपास यंत्रणांना चौकशीत पूर्ण सहकार्य केले असून त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा’, असा युक्तिवाद भुजबळ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हर्षद पोंडा यांनी केला. त्यांचा युक्तिवाद बुधवारी अपूर्ण राहिल्याने गुरुवारीही सुरू राहणार असून त्यानंतर सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. हितेन वेणेगावकर युक्तिवाद मांडतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!