नाशिक : नुकतेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र या वर्षभरात भाजपने हे सरकार पडणार असे दावे अनेकवेळा केले आहेत. दरम्यान, अशात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आत्मविश्वासात कमालीची भर पडली आहे.
त्यावरुन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे नंबर एकचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली. जयसिंगराव गायकवाड यांनीही भाजपला रामराम ठोकला. पदवीधरमध्ये पुणे, नागपूरमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आहे. त्यामुळे आता राजकारणाची हवा बदलली आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याची टीका भाजप नेते सातत्यानं करत असतात. पण महाविकास आघाडी एकसंध राहील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. आता भीती महाविकास आघाडी नाही तर भाजपच्या लोकांना आहे. भाजपमधील लोकप्रतिनिधींनी खडसे आणि जयसिंगरावांच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं तर अवघड होईल, असा टोलाही भुजबळांनी लगावला आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारला आता 5 नाही तर 25 वर्षे भीती नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी आपल्या एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, हे तर केंद्रातील मोदी सरकार आहे’
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- ‘विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नाबाबत तातडीच्या उपाययोजना करा’
- ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात 14 डिसेंबरपासून होणार मोठा बदल
- ‘रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला भारदस्तपणा मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला आपण मुकलो’

