🕒 1 min read
नवी दिल्ली : चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (SA vs IND) असेच काहीसे पाहायला मिळाले. पहिल्या दिवसाच्या खेळात फलंदाजीसाठी मैदानात आलेला पुजारा गोल्डन डकवर बाद झाला. याशिवाय त्याने एक नकोसा विक्रमही आपल्या नावावर केला.
भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पुजाराच्या नावावर सर्वाधिक शून्याचा विक्रम झाला आहे. त्याने या बाबतीत भारताचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले आहे. पुजाराच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे गोल्डन डक ठरले. पहिला गोल्डन डकही दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध आला होता.
पुजारा (9 वेळा) भारताकडून सर्वाधिक बाद होण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर दिलीप वेंगसरकर यांचे नाव आहे, जे खाते न उघडता 8 वेळा बाद झाले आहेत. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडचेही नाव या यादीत आहे. द्रविड 7 वेळा शून्यावर बाद झाला आहे. मोहिंदर अमरनाथने 6 वेळा अजित वाडेकरने 5 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
1st Test. 40.3: WICKET! C Pujara (0) is out, c Petersen b Lungi Ngidi, 117/2 https://t.co/g5Y4COxn28 #SAvIND
— BCCI (@BCCI) December 26, 2021
भारतीय संघासाठी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम शतकी भागीदारी केली. मयंक अग्रवालने अर्धशतक झळकावले 60 धावा करून तो बाद झाला. त्याच्याशिवाय केएल राहुलने क्रीजवर खेळताना धावा केल्या आणि शतक झळकावले. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी टीम इंडियाला चागली सुरुवात करून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

