टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच फेरीत म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचं भारतीय निवडणूक आयोगानं आयुक्त सुनिल अरोरा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत निवडणुक कार्यक्रमाची घोषणा करताना बोलत होते.
या कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. पाच ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून ७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. महाराष्ट्रात एक लाख ८० हजार तर हरियाणात एक लाख ३० हजार ईव्हीएम यंत्रांच्या सहाय्याने मतदान घेण्यात येणार आहे. आयोगानं उमेदवारांना २८ लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा देखील ठरवून देण्यात आली आहे. या दोन्ही राज्यासांठी आदर्श आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत नऊ नोव्हेंबर रोजी तर हरियाणा विधानसभेची मुदत २ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे दोन नोव्हेंबरपूर्वी दोन्ही राज्यातील निवडणुका आटोपल्या जातील, असं अरोरा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ तर हरियानात ९० जागांसाठी या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रात आठ कोटी ९४ लाख मतदार असून हरियाणात एक कोटी ८२ लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्जात एकही कॉलम रिकामा ठेवल्यास त्याची उमेदवारी बाद ठरेल, असंही अरोरा यांनी यावेळी सांगितलं. नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुरक्षेची विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1175346337119752192?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1175343006209069057?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1175342767284703232?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

