Share

मुख्यमंत्री पदाबाबत चंद्रकांत दादा म्हणतात… अनेक पद अनपेक्षितरीत्या मिळतात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा भाजप श्रेष्ठींनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हातात दिली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला भाजपकडून नवी रणनीती आखली जाणार का ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच युती सरकार आले तर मुख्यमंत्री कोणाचा आणि कोण असणार ? यावर चर्चा होत आहेत. याबाबत भाजपचे नवोदित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे भविष्यात मुख्यमंत्री पदाची आशा आहे का ? असा प्रश्न विचाराला असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, तुम्हाला अनपेक्षितरीत्या पद मिळत असतात. त्यामुळे अध्यक्षपदी विराजमान होईल याची देखील कल्पना नव्हती. पाच वर्षांपूर्वी मी भाजप अध्यक्ष होणार म्हणून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी शपथविधीच्या दिवशी मंत्री व्हायचं सांगण्यात आले. त्यामुळे अनेक पद तुम्हाला अनपेक्षितरीत्या मिळत असतात.

तसेच मी सरकारच्या कार्यकाळात कधीच मुख्यमंत्री पदावर दावा केला नाही. आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणी आक्षेप देखील घेतला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. माणसाला प्रत्येक गोष्ट अचानक मिळत असते. ती अचानक मिळणारी गोष्ट सर्वोत्तम माणून घ्यायची असते, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका मांडली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!