कोल्हापूर : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत लढलेल्या शिवसेनेने अचानक साथ सोडल्यानंतर भाजपची सत्ता राज्यातून गेली. त्यानंतर आकड्यांची जमवा-जमव करत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची मिळून तयार झालेल्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात उदयास आले. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाकडून होणाऱ्या वारंवार टीका, नैसर्गिक आपत्ती, कोरोना महामारी अशा संकट काळात सहामाही पूर्ण करत हे सरकार अजून टिकलेले आहे.
आता गेल्या ३ महिन्यात अनेक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?
तर , शिवसेना सध्या हवेत आहे. त्यांना वाटतंय की स्वर्गाला बोटं टेकली आहेत. ते सध्या एकत्र यायला तयार होतील असं वाटत नाही.असेही ते म्हणाले. उद्या आम्ही एकत्र आलोच तर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारचं घेईल. एकत्रित निवडणुका लढवायच्या आणि सोयीचे राजकारण करायचं हे राजकारण योग्य नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार होतो. पण शिवसेनेचा एकत्र यायला तयार नव्हती, असा आरोप करतानाच आमच्याकडे १०५ आमदार आणि त्यांच्याकडे ५६ आमदार असे असताना ते मुख्यमंत्रिपद मागूच कसे शकतात? असा सवाल त्यांनी केला.
राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही, नितेश राणेंचा घणाघात


