अहमदनगर : आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाहीत”, अशी घणाघाती टीका भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
दूधाचे दर वाढू नये ही मंत्र्यांचीच भूमिका असून दूध संघातून मिळणारा मलिदा खाणारे मंत्री आहेत”, असा घणाघाती आरोप भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. “दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्याचीच भूमिका आहे. आपल्या दुधसंघातून मलिदा खाण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात गेला आहे. मुख्यमंत्री दबावाखाली काम करत आहेत. त्यांना स्वतः काही निर्णय घेता येत नाहीत”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मराठा आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ उपसमितीसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जनतेची सरकारने फसवणूक केली आहे. हे फेकू सरकार आहे, असा आरोप विखे पाटलांनी केला. तर राज्यातील कोरोनाची परीस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले असून, आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका करत असल्याचं विखे पाटील म्हणाले.
मुंबईत सातत्याने कमी चाचण्यामुळे संसर्गाचे प्रमाण चिंताजनक, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


