नवी दिल्ली : भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत असून आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
Bharatiya Janata Party (BJP) Maharashtra President, Raosaheb Patil Danve resigns from his post. (file pic) pic.twitter.com/O02r27mZrF
— ANI (@ANI) July 16, 2019
दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि संघटनेत केलेलं काम यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता लगेच भाजपने ही निवड जाहीर केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

