टीम महाराष्ट्र देशा : अखेर महाविकास आघाडी मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर झाले. परंतु ठाकरे सरकारने केलेल्या या खातेवाटपावर सरकारमधलेच काही नेते नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. याचप्रमाणे विरोधकांनी देखील खातेवातपावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेसाठी आज मतदान होत आहे. तसेच यावेळी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले. सरकारच्या खातेवाटपावर भाष्य करत, काँग्रेस नेते आणि राज्याचे ओबीसी, खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला.
तसेच पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने खातेवाटपात विदर्भावर अन्याय केला. विजय वडेट्टीवार यांना दुय्यम खाते मिळाले आहे. इतकंच नाही तर नाराज विजय वडेट्टीवार भाजपात आलेच तर त्यांचे स्वागत आहे. वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, खातेवाटपानंतर आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला वडेट्टीवार उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे सध्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खर जमीन विकास, भूकंप पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
