🕒 1 min read
Sara Ali Khan | मुंबई: अनुराग बासू (Anurag Basu) चा लाईफ इन मेट्रो (Life In Metro) हा सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, के के मेनन, आणि शर्मन जोशी हे कलाकार दिसले होते. या चित्रपटाला चाहत्यांकडून उत्तम पसंती मिळाली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची आतुरता लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये ‘लाइफ इन मेट्रो’ चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य आणि सारा ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
‘लाइफ इन मेट्रो’ या चित्रपटाचे अनेक चाहते आहे. चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कधीपासून प्रतीक्षा करत आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून ‘लाइफ इन मेट्रो’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे नाव ‘मेट्रो इन दिनो’ असणार आहे. अनुराग बासू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
Sara Ali Khan | 'लाईफ इन मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये सारा अली खान आणि 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेतhttps://t.co/rxvsPZwkdg
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 8, 2022
‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटाची कथा आजच्या काळावर असणार आहे. पण याबद्दल अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. अनुराग बासू गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटावर काम करत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर दोघेही यासाठी उत्सुक आहे. हा चित्रपट अनुराग बासूच्या प्रोडक्शन हाऊस आणि टी-सिरीज बॅनरखाली निर्मित केला जाणार आहे.
‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटांमध्ये सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूर यांच्या व्यतिरिक्त अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकना सेन शर्मा, अली फजल, फातिमा सना शेख इत्यादी कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर! काँग्रेस आघाडीवर
- Amol Mitkari | “विजय शिवतारे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये…”; अमोल मिटकरींचा घणाघात
- Tecno Pova 4 | उत्कृष्ट फीचर्ससह लाँच झाला टेक्नोचा Tecno Pova 4 मोबाईल
- Amol Mitkari | “सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”; सीमाप्रश्नावरून अमोल मिटकरींचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Election Results | गुजरातमध्ये भाजपची विक्रमी बहुमताकडे वाटचाल, हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
