Share

जर मला तिकीट मिळाल नाही तर माझ्या पत्नीला तिकीट मिळणे हे चुकीचचं – चंद्रशेखर बावनकुळे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘जर बावनकुळेंना तिकीट मिळालं नाही तर त्यांच्या परिवारात दुसर कोणाला तिकीट मिळणे योग्य नाही. ते पक्षातील योग्य कार्यकर्त्याला दिल गेल पाहिजे, अशी प्रतिक्रिया उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच माझ्या पत्नीसाठी भरलेल्या अर्जाला एबी फॉर्म नसल्याने तो अर्ज बाद होणार आहे, असे स्पष्टीकरण देत बावनकुळे यांनी पत्नीला मिळणाऱ्या उमेदवारीच्या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

ते म्हणाले की, एकाला तिकीट मिळाल की दुसऱ्याने समजून घ्यायचे असते की, आल्याला तिकीट मिळणार नाही. तर पक्षाने मला पूर्व विदर्भातील सर्व उमेदवारांसाठी प्रचार प्रमुख म्हणून काम करण्याची जबाबदरी ती मी पूर्ण करणार आहे. मला तिकीट मिळाल नाही याच वाईट वाटल नाही. जिथे ५० टक्क्यांपेक्षा जास्त रेटिंग असते. तिथे नवीन उमेदवार दिले गेले पाहिजेत. तीन चार वेळा आमदार राहिलेल्या लोकांनी पक्ष संघटनेसाठी कम केले पाहिजे. मी ते काम करत राहील.

भाजपने आगामी निवडणुकांसाठी मोठ्या नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली आहे यात. यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक अनेक मोठे नेते आहेत. तर पूर्व विदर्भातून कामाठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बावनकुळे समर्थक प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे नाराज झालेले बावनकुळे यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना पूर्व विदर्भाचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र पक्षातील योग्य कार्यकर्त्याला तिकीट मिळाले आहे असे सांगत त्यांनी सर्व चर्चना पूर्णविराम दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1180737494158995457?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1180733980330450944?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1180733699152699392?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!