Share

कोथरूड मधून ‘हा’ नेता देणार चंद्रकांत पाटलांना आव्हान

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र चंद्रकांत पाटील हे कोथरूड मधून लढणार असल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. तर चंद्रकांत पाटलांच्या विरोधात शिवसेनेतील माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनीचं बंड पुकारत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

चंद्रकांत पाटील हे पुण्यातून निवडणूक लढणार असल्याने त्यांच्यासाठी कोथरूड हा मतदारसंघ निवडला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपच्या काही स्थानिक नेते नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आता मेधा कुलकर्णी यांना राज्यातील इतर ठिकाणी उमेदवारी मिळते की त्यांना इतर कुठली मोठी जबाबदारी देण्यात येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याच बरोबर त्यांना विधानपरिषदेवर सुद्ध पाठवले जाऊ शकते.

दरम्यान भाजप संसदीय कमिटीची बैठक रविवारी रात्रीपर्यंत दिल्लीमध्ये सुरू होती. बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करतानाच भाजप उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील विद्यमान तीन आमदारांना भाजपने नारळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातून लढणार असल्याचं जाहीर झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1178643781811179526?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178643600936095744?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!