Share

‘गेंड्याच्या कातडीचे मंत्री व महाविकास आघाडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही’

Published On: 

पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, महाविकास आघाडीचे गेंड्याच्या कातडीचे सरकार राजीनामा घेईल का ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

‘सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल राजीनामा द्यायला हवा. त्यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजप महिला शाखेच्या वतीने एका पत्रकाद्वारे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर, आता आम्ही देखील या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत.’

‘ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात त्या व्यक्तीला या पदांवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून त्यांचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे’, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!