टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भविष्यात एकत्र येणार आहेत. दोन्ही पक्ष आता थकले आहेत. त्यामुळे लवकरच विलीनीकरण कराव लागणार आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत. आता शिंदे यांचे हे वक्तव्य चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मोठा वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या वक्तव्याचे खंडन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुशीलकुमार शिंदे हे आपल्या पक्षाबद्दल बोलू शकतात. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे आणि मला त्याबद्दल अधिक माहिती आहे. त्यामुळे मी काही यावर बोलणार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना चंद्रकात पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला. ‘काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं माहीत नाही, पण त्यांची मुलं तिथं कंटाळली आहेत. त्यामुळेच ती आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये आलं तर आश्चर्य वाटू देऊ नका,’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकच खळबळ उडवून दिली.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशीलकुमार शिंदे स्वतः थकले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष थकलेले नाहीत, थकणारही नाहीत असं आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182203588270903296?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182203387737018369?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182203193758871554?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

