Share

‘दादा तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज येत नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – आज  पुण्यात सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हीएशन गॅलरीचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजित पवार आणि कोथरुडचे भाजप आमदार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली . ‘अजितदादा डायनॅमिक लीडर आहेत. दादा तसे प्रेमळ आहेत, फक्त रागीट वाटतात. दादा तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज येत नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात’, असंही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी विविध विकास कामांवर भाष्य करताना अजित पवारांकडे विमानतळ आणि हेलिकॉप्टरची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्याला एक छोटं का होईना विमानतळ असलं पाहिजे. सगळे नियम पूर्ण करणारे एक हेलिपॅड प्रत्येक जिल्ह्यात असावं. अत्यावश्यक वेळेत हे गरजेचे आहे. अजित पवार या मागण्या पूर्ण करतील. ते डायनॅमिक लीडर आहेत. तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलायची गरज नाही, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात”

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!