Share

‘आमचे कुणीही आमदार कुठेही जाणार नाही पण आम्हीच त्यांचे आणतो आहोत’

Published On: 

🕒 1 min read

पुणे- राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे.विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

विरोधकांकडून आमचे आमदार जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहे यावर नवाब मलिक यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.आमचे आमदार जाण्याऐवजी निवडणूकीच्या अगोदर भाजपात गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत यायला आतुर झाले आहेत.परंतु यावर कोणताच निर्णय झालेला नाही.मात्र यावर लवकरच निर्णय होवून त्याची माहिती दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामंही होत नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले असा होत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार आमच्यासोबत इतकी खुन्नस काढते आहे कि छोटी छोटी कामे देखील केली जात नाही. त्यामुळे जर आपल्या मतदार संघातील प्रश्न घेऊन जर कुणी आमदार शरद पवार यांना भेटले असेल त्यात गैर काय आहे.परंतु, या भेटींनंतर ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वातावरण मुद्दामहून महाविकास आघाडीचे काही नेते निर्माण करत आहे. मात्र ,कुणी भाजप आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही. तसेच आमचे कुणीही आमदार कुठेही जाणार नाही पण आम्हीच त्यांचे आणतो आहोत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

कोकणातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा फडणवीसांच्या उपस्थित ‘भाजपा’त प्रवेश

धक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!