उस्मानाबाद- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. उस्मानाबादेतील भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित झाले आहेत.काही दिवसांपूर्वी आमदार ठाकूर यांच्या आई आजारी असल्याने कुटुंबातील सर्वांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली होती.त्यात ठाकूर यांच्या कुटुंबातील सहा जणांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.
मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. अनेकांचे काॅल येतात. पण सर्व काॅल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. लवकर बरे होऊत. लवकरच जनसेवेत असेन https://t.co/1xgKaz0gis
— Sujitsingh Thakur (@sujit_thakurmlc) August 9, 2020
आमदार ठाकूर यांच्यासह सर्व कुटुंबीयांची प्रकृती चांगली असल्याची माहिती ठाकूर यांनी सोशल मीडियाद्वारे प्रसारित केली आहे. सोशल मिडीयावर त्यांनी लिहले आहे की, ‘मी 3 ऑस्टपासून कुणाच्याही संपर्कात आलेलो नाही. मंगळवारी 4 ऑगस्टला कुटुंबातील सर्वांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील 6 सदस्यांचे रिपोर्ट सकारात्मक आले आहे.
संपर्कात आलेल्या इतरांची ही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल हे प्रतीक्षेत आहे. माझ्यासह कुटुंबातील सर्वांची प्रकृती ही चांगली आहे. आपणही आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी’ असे आवाहन सुजितसिंह ठाकुर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
दिलासादायक: तब्बल १५ लाख रुग्णांनी गेले कोरोनाला चितपट!
‘राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत’
क्रेडाईचे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

