पुणे : ज्याचा हातामध्ये वाढणं असत, तो आपल्या माणसाच्या ताटामध्ये जास्त वाढतो, तसं आदित्य ठाकरे यांना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं आहे, असा मुंबईमधील वरळी डेअरीच्या जागेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काल बोलत होते.
वरळी येथील कोट्यवधींची जागा ही प्रेक्षणीय स्थळासाठी देणार? आणि त्यावर एक हजार कोटी खर्च करणार, एक हजार कोटी काढले कोठून? त्याची डिझाईन तयार नाही, डिपीआर तयार नाही, इस्टिमेट तयार नाही तर मग हे एक हजार कोटी ठरवले कोठून, असा सवाल करत पाटील यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे हे पर्यटनमंत्री आहेत त्यामुळे मुंबईमध्ये ८ हजार कोटी रुपयांची वरळी डेअरी येथील जागा प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी दिली आहे. यासाठी तब्बल १ हजार कोटी रुपये दिले आहेत. ८ हजार कोटी रुपये खर्च करून प्रेक्षणीय स्थळ उभारण्याची स्थिती महाराष्ट्राची आहे का? मी कृषी मंत्री होतो, ८ ते ९ हजार कोटींमध्ये महाराष्ट्राचा अख्खा दुष्काळ निघतो. त्यात टँकर, गुरांच्या छावण्या, नुकसान भरपाई द्यायची असते. यासाठी 13 कोटी म्हणजे फार झाले.
दरम्यान,आज ‘शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही,’ अशी जळजळीत टीका पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. ‘शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम चालू असताना आता अजित पवारांचं व्यक्तिमत्व कमाल असून आपल्याला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचं, यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले.


